Pune Crime News : वानवडीतील सनी हिवाळे टोळीवर मोकाची कारवाई

एमपीसीन्यूज : वानवडी परिसरात दहशत निर्माण करणा-या गिरीष उर्फ सनी महेंद्र हिवाळे टोळीतील ७ जणांविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोका) नुसार कारवाई करण्यात आली आहे. कारवाईमध्ये टोळीतील दोन महिलांचा समावेश आहे. त्यांच्याविरूद्ध कारवाईचे आदेश पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

सनी हिवाळे, आकाश संतोष भारती, चेतन पांडूरंग ढेबे, अनिकेत उर्फ मॉन्टी शरद माने, काजल मधुकर वाडकर, आंबिका अर्जुन मिसाळ, सूरज महादेव नवगीरे अशी मोकानुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

सनी हिवाळे हा टोळीप्रमुख असून टोळीवर खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, दहशत निर्माण करणे, जबरी चोरी, दरोडा, खंडणी असे गुन्हे दाखल आहेत. टोळीच्या विरोधात मोकाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.