Pune Crime News : पुण्यात खंडणीखोर गुंड टोळीवर ‘मोक्का’

एमपीसी न्यूज – व्यावसायिकांकडून खंडणी उकळणारा (Pune Crime News) गुंड लक्ष्मण उर्फ भैया शेंडगे याच्यासह साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

 

लक्ष्मण उर्फ भैया येडबा शेंडगे (वय 23), स्वामी ऊर्फ काळू ज्ञानेश्वर खवळे (वय 22), आदित्य गणेश मंडलीक (वय 20), अनिल बापू बनसोडे (वय 30, रा. सर्व, म्हाडा वसाहत, वारजे) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.

 

 

Pimpri News : पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात ‘ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया’ पुस्तकाचे प्रकाशन

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंडगे आणि त्याच्या साथीदारांनी वारजेतील बिअर शॉपीमध्ये दमदाटी करून जबरदस्तीने बिअरच्या बाटल्यांची खोकी नेली होती. बिअर शॉपी चालकाने त्यांच्याकडे पैशांची (Pune Crime News) मागणी केली. तेव्हा आरोपींनी त्याला दमदाटी करून खंडणी मागितली होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.