Pune Crime News : बिबवेवाडीतील दर्शन हाळंदे टोळीवर मोक्का

एमपीसीन्यूज : बिबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणारा गुन्हेगार दर्शन हळंदे आणि त्याच्या टोळीवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

दर्शन युवराज हळंदे (वय 21) व रोहन उर्फ मोन्या बाळू सातपुते (वय 18, रा. कात्रज) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर त्यांच्या इतर साथीदारांचा समावेश आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दर्शन हाळंदे याने काही साथीदारांच्या मदतीने बिबेवाडी परिसरात दहशत पसरली होती. 5 जणांना सोबत घेऊन त्याने संघटित गुन्हेगारी टोळीच तयार केली होती. या भागात त्याने वर्चस्व निर्माण करण्यासाठी एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी गुन्हा दाखल असताना पोलिसांनी तपास केला असता हाळंदे याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्याच्या गुन्हेगारी कृत्याला बसावा यासाठी मोक्का अंतर्गत कारवाई करावी, असा प्रस्ताव बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे यांनी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील व अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावाची छाननी करण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने या टोळीवर मोक्का कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.