Pune Crime News : सराईत गुन्हेगार टोळीवर मोक्का

एमपीसी न्यूज – खडक परिसरात खंडणी आणि गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार उमेश मुकेश वाघमारे आणि त्याच्या पाच साथीदारांवर मोक्का (Pune Crime News )कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये टोळीप्रमुख उमेश मुकेश वाघमारे (वय 24), मंदार संजय खंडागळे (वय 21), आदित्य लक्ष्मण बनसोडे ऊर्फ भुंड्या (वय 19) गणेश मारुती शिकदार (वय 19), विनायक ऊर्फ नंदू सुनील शिंदे (वय 22) आणि एक फरारी आरोपीचा समावेश आहे.
Pune News :भवानी पेठेतील मणिभवन वाडा येथे आग ,एकाचा मृत्यू
आरोपी उमेश वाघमारे आणि त्याच्या साथीदारांनी 24 नोव्हेंबर रोजी शुक्रवार पेठेतील एका व्यक्तीकडे खंडणीची मागणी केली होती. परंतु त्यांनी खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, शस्त्रांचा धाक दाखवत परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी खडक पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले होते.
त्यानुसार या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. पुढील तपास (Pune Crime News ) सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर करीत आहेत.