Pune Crime News : सुनेला विष पाजून ठार मारण्याचा सासू सासऱ्याचा प्रयत्न

एमपीसीन्यूज : सासू-सासऱ्यानेच सुनेला फिनेलच्या बाटलीतील विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शिवणेतील आशिर्वाद गार्डन सोसायटीत घडली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सासू-सासरे नणंद, दीर, नणंदेचा पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रियंका विक्रांत मोहिते (वय 26, रा. शिवणे ) यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका आणि विक्रांत यांचे 2017 मध्ये लग्न झाले. तेव्हापासून प्रियंका सासरी नादंत असताना पती विक्रांत, सासरा शशिकांत, सासू-सासरे, नणंद, दीर, जाउबाई, नणंदेचा पती हे सर्वजण तिचा छळ करीत होते.

दरम्यान, 19  फेब्रुवारीला किरकोळ वाद झाल्यानंतर सासू-सासू-सासऱ्यानी प्रियंंकाला फिनेलच्या बाटलीतून औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.