गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Pune Crime News : पोल्ट्री व्यावसायिकाकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना महावितरण अभियंता रंगेहात जाळ्यात

एमपीसी न्यूज – पोल्ट्रीसाठी कनेक्शन देण्यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

राहुल श्रीरंग लकडे (वय 32) असे रंगेहात पकडलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी दौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  लकडे हे लोकसेवक असून, ते दौड तालुक्यातील पिंपळगाव शाखा कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून नेमणुकीस आहेत.

यातील तक्रारदार यांच्या शेतात पोल्ट्रीसाठी विद्युत कनेक्शन देण्याचे प्रकरण प्रलंबित आहे. याबाबत त्यांनी एमएसईबीकडे अर्ज केले होते. यावेळी लोकसेवक लकडे यांनी त्याचे कोटेशन बनवून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली होती. त्यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज केलेल्या सापळा कारवाईत 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

Latest news
Related news