Pune Crime News : महावितरणच्या पथकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, महिलेविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वीज बिलाच्या थकीत रकमेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर दोन महिलांसह पाच जणांनी हल्ला केलाय. इतकेच नाही तर यातील एका महिलेने महावितरण पथकातील कर्मचाऱ्यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकल्याचे धमकी दिली.

पुण्यातील गोसावी वस्तीत प्रकार घडला असून याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली. अलंकार पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी महावितरणचे कर्मचारी मनोहर राठोड (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे आपल्या काही कर्मचाऱ्यांसह थकीत बिलाची रक्कम तपासत असताना एक महिला हातात कोयता घेऊन आली आणि तिने आरडाओरडा करत माझ्या घरी कसे आलात असे म्हणत, तुम्हाला रेप करण्याचा आरोपी करेल अशी धमकी दिली.

तर या महिला सोबत असलेल्या इतरांनी पथकाच्या हातातून कागदपत्र हिसकावून घेतली आणि इतर आरोपींनी कॉलर पकडून लोखंडी रॉडने फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. अलंकार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साखरे करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.