Pune Crime News : ‘माझ्याकडे काय बघतोस’, असे म्हणत एकावर खुनी हल्ला, तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : पुण्याच्या दत्तवाडी परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणावर खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये संबंधित तरुणांचे हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी निलेश जोगदंड (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ( दि. ७) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जोगदंड हे घराच्या बाहेर उभे होते. यावेळी त्यांच्याकडे शेजारी राहणारा तरुण आला आणि त्याने माझ्याकडे काय बघतोस असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्याने आणखी दोन मित्रांना बोलावून घेत निलेश जोगदंड यांना लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. आणि घटनास्थळावरून पळ काढला. जोगदंड यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.