Pune Crime News: ‘आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणत तिघांवर खुनी हल्ला करणाऱ्यास 24 दिवसानंतर अटक

आरोपींनी फिर्यादी रोहित यांच्यावर कोयत्याने वार करत दगडाने मारून खुनी हल्ला केला. या हल्ल्यात रोहित यांच्या डोक्यात, छातीत गंभीर दुखापत झाली.

एमपीसी न्यूज – ‘तुम्हाला आमची भीती वाटत नाय का, आम्ही इथले भाई आहे. तुम्हाला खल्लास करुन टाकू’ अशी धमकी देत तीन जणांवर चौघांनी खुनी हल्ला केल्याची घटना 1 ऑगस्ट रोजी दुपारी साडेपाच वाजता कर्वेनगर येथे घडली. यातील तिघांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, चौथा मुख्य आरोपी अद्याप फरार होता. त्याला 24 दिवसानंतर वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

अनिल गुरुनाथ सासवे (वय 23, रा. रामनगर, वारजे पुणे), नितीन लक्ष्मण पद्माकर (वय 20, रा. निळे वादळ चौक, रामनगर पुणे), महादेव प्रल्हाद जावळे (वय 24, रा. तुळजाभवानी चौक, रामनगर वारजे पुणे), मयुर रमेश कुडले (वय 19, रा चौधरी चाळ केंनॉल रोड वारजे पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील अनिल सासवे याला पोलिसांनी 24 ऑगस्ट रोजी अटक केली आहे.

रोहित सावळाराम पोटे (वय 23, रा. अमिक कॉलनी, कर्वेनगर पुणे) यांनी याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौघांनी मिळून 1 ऑगस्ट रोजी दुपारी साडेपाच वाजता कर्वेनगर परिसरात हातात लोखंडी कोयत्यासारखे हत्यार घेऊन त्या हत्याराने लोकांना धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण केली.

_MPC_DIR_MPU_II

तसेच फिर्यादी आणि त्यांचे मित्र कुणाल साकला व आकाश या तीघांना शिवीगाळ करत ‘तुम्हाला आमची भीती वाटत नाय का, आम्ही इथले भाई आहे. तुम्हाला खल्लास करुन टाकू’ अशी धमकी दिली.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी रोहित यांच्यावर कोयत्याने वार करत दगडाने मारून खुनी हल्ला केला. या हल्ल्यात रोहित यांच्या डोक्यात, छातीत गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपी अनिल सासवे पळून गेला होता.

त्याचा शोध घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, 24 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आरोपी अनिल नांदेड सिटी रोडवरील प्रयेजा सिटी येथे येणार आहे. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा लावला. आरोपी अनिल कारमधून तिथे आला.

पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतना पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

फिर्यादी रोहित पोटे याच्यासोबत मागील काही दिवसांपूर्वी आरोपी अनिल याचे भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून मित्रांसोबत मिळून हा गुन्हा केल्याचे अनिल याने कबूल केले आहे. त्यावरून अनिल याला अटक करण्यात आली आहे. वारजे माळवाडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.