Pune Crime News : बिबवेवाडीत पूर्ववैमनस्यातून दोघांवर खुनी हल्ला, एक अटकेत

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार केल्याची घटना सोमवारी रात्री बिबवेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून दहा ते बारा जणांचा शोध सुरू आहे.

केदार गणेश रापर्ती (वय 20, रा. अप्पर इंदिरानगर) याला अटक केली आहे.चंदर राठोड (वय १८, रा. अप्पर इंदिरानगर) याने तक्रार दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

केदार आणि रोठोड यांचे पूर्वीचे वाद आहेत. सोमवारी रात्री केदार बिबवेवाडीत साथीदारांसोबत आला. त्याने जमाव जमवून राठोड, त्याचे मित्र करण शिंदे, ओंकार भिसे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये राठोड व करण शिंदे यांच्या डोक्यात व हातावर वार झाल्यामुळे ते जखमी झाले. इतरांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.