Jejuri Crime News ; किरकोळ कारणावरून मित्राचा खून, मृतदेह तलावात फेकला

एमपीसीन्यूज : जेजुरी परिसरातून खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ कारणावरून मित्रानेच मित्राचा खून केला असून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात फेकून दिला.

प्रसाद मल्हार दळवी (वय 41) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेजुरी पोलिसांना जेजुरीतील होळकर तलावावर वादावादी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तलावाच्या किनाऱ्यावर रक्ताने माखलेला दगड दिसला तसेच रस्त्याच्या कडेला एक दुचाकी होती.

_MPC_DIR_MPU_II

दुचाकीविषयी अधिक माहिती घेतली असता ती प्रसाद दळवी यांच्या मालकीची असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तलावात शोध सुरू केला.

पोलिसांनी काही नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवत 20 फूट खोल पाण्यातून गळाच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला. मयताच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमा असल्याचे आढळून आले.

घटनेच्या रात्री मयत प्रसाद सोबत असणाऱ्या व्यक्तींची नावे पोलिसांना समजली असून त्यांचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.