Pune Crime News: कॅम्पमधील बाबाजान चौकात तरुणाचा मित्राकडून किरकोळ कारणावरून खून

एमपीसी न्यूज – दोन मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर त्यातील एकाने दुसऱ्याचा चाकूने वार करून खून केला आहे. ही घटना आज रात्रीच्या सुमारास लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कॅम्प परिसरात घडली.

उबेद बाबू कुरेशी (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी नबील शब्बीर बेलीम याला ताब्यात घेतले आहे. लष्कर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मयत आणि आरोपी दोघेही एकमेकांचे चांगले. आज रात्रीच्या सुमारास ते कॅम्प परिसरातील बाबाजान चौकात बसले होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला.

वादाचे पर्यवसान भांडणात झाले आणि नबील बेलिम याने उबेद कुरेशी याच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर उबेद कुरेशी हा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता.

येन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. त्यातीलच एकाने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर लष्कर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेल्या उबेद कुरेशी याला रुग्णालयात नेले.

पण उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.