Pune Crime News : पूर्ववैमनस्यातून कुऱ्हाडीने वार करून तरुणाचा खून, औंध परिसरातील घटना

एमपीसीन्यूज : चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील औंध परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. आज सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. कुर्‍हाडीचे सपासप वार करून हा खून करण्यात आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

क्षितिज वैरागर (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चतुशृंगी पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैरागर आणि आरोपीचे यापूर्वीचे वाद होते. मयत क्षितीज हा चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील औंध परिसरात राहण्यास होता. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो घराबाहेर थांबला होता. सगळी हातात कुऱ्हाड घेऊन आलेल्या आरोपीने त्याच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले आणि पळ काढला.

डोक्यात कुर्‍हाडीचे घाव लागल्याने गंभीर जखमी होऊन क्षितिजचा मृत्यू झाला. दरम्यान, खून झाल्याची घटना औंध परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने काही वेळ या भागात दहशत निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच चतुशृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.