Pune Crime News : दोन वर्षांपूर्वी झालेल्या खुनाला फुटली वाचा, दोघांना अटक

एमपीसीन्यूज  : दोन वर्षांपूर्वी येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन वर्षापासून या गुन्ह्याचा तपास पोलीस करत होते.  अखेर  पोलिसांना या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले असून त्यांनी दोघांना अटक केली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे आरोपींनी हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

कुणाल किसन जाधव उर्फ राजा (रा. खराडी) आणि राकेश बापू भिसे उर्फ गंद्या (रा. लक्ष्मीनगर येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. देवा राठी ब्रम्हशील, असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव होते.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, 25 मे 2019 रोजी येरवड्यातील डॉन बॉस्को शाळेच्या पाठीमागे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. हा मृतदेह देवा राठी ब्रह्मशील या व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस नाईक अमजद शेख यांना हा खून वरील आरोपीने केला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे आरोपीने त्याचा खून केला होता.

ही  कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख,  पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, तपास पथकातील अधिकारी समीर करपे, पोलीस कर्मचारी प्रदीप सुर्वे, बाळासाहेब गायकवाड, अमजद शेख, तुषार खराडे, नवनाथ मोहिते, गणेश वाघ यांच्या पथकाने केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.