Pune Crime News : पुण्यात खूनाचे सत्र सुरूच, कोंढव्यात दगडाने ठेचून तरुणाचा खून

एमपीसीन्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेले खुनाचे सत्र काही थांबण्याचे नाव घेइना. दोन दिवसांपूर्वीच खराडी परिसरात सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाली असून एका व्यक्तीचा पूर्ववैमनस्यातून दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे.

विठ्ठल दांडे (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोंढवा येथील कृष्णा नगर परिसरात हा प्रकार घडला. कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या खून प्रकरणातील आरोपी आज, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास काही व्यक्तींसोबत दारू पिण्यासाठी बसला होता. त्यांच्यामध्ये यापूर्वीही वाद झाले होते.

दारू पिताना हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला. त्यानंतर आरोपीने दगडाने ठेचून विठ्ठल दांडे त्याचा खून केला.

कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.