Pune Crime news : ‘मी डॉन असून मर्डर केलाय, माझ्या नादाला लागू नका” असे म्हणून सराईताचा तरुणावर खुनी हल्ला

एमपीसीन्यूज : तरूणीसोबत माझे लग्न लावून द्या, नाहीतर मी डॉन आहे. मर्डर केलेला असून माझ्या नादाला लागू नका. मी गुन्हेगारच आहे, एक गुन्हा आणखीन वाढेल, अशी धमकी देऊन सराईताने तरूणाच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना न-हे येथे घडली.

मयूर राजेंद्र शिंदे (वय २८, रा. न-हे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सौरभ जाधव (वय २०, रा. न-हे )असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ आणि मयूर न-हेत राहायला आहेत. सौरभ यांची एक नातलग तरुणी असून तिच्याशी माझे लग्न लावून द्या अशी मागणी मयूरने दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी जाउन केली.

_MPC_DIR_MPU_II

माझे लग्न लावून न दिल्यास तुमच्या घरातील एकालाही जिंवत सोडणार नाही. जर लवकर लग्न लावून दिले नाही, तर मी एक गुन्हेगाराच आहे असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली.

‘अरे मी डॉन आहे, मी मर्डर केलेला असून माझ्या नादाला लागू नका’, अशी धमकी त्याने सौरभ यांना दिली. मी कोणालाही सोडणार नाही असे म्हणत मयूरने सौरभला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर ब्लेडने वार करून गंभीररित्या जखमी केले.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पी. बी. कणसे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.