Pune Crime News : कुख्यात गुन्हेगारानेच केली न्यायालयाची फसवणूक

खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : कुख्यात गुन्हेगार निलेश बसवंत याने न्यायालयात खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून न्यायालयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बापू नायर टोळीतील गुंड निलेश बसवंत (रा. अपर इंदिरानगर) याला पोलिसांनी २०१५ मध्ये अटक केली होती. त्यानंतर त्याने दुर्धर आजारावर उपचारासाठी सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळविला होता. त्यानंतर निलेश १६ एप्रिल २०२० पासून जामीनवर आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्याने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांबाबत पोलिसांना संशय आला होता. त्यानुसार निलेशने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली. त्याशिवाय खासगी दवाखान्यात भेट देउन त्याच्या आजाराबाबतची माहिती घेतली.

निलेशने सातारा येथील शेंद्रेतील डॉ. दत्तात्रय अंदुरे यांचे खोटे प्रमाणपत्र न्यायालयात सादर केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, प्रवीण शिर्के, सुजीत वाडेकर, राहूल जोशी, विशाल शिंदे, संदेश काकडे, योगे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.