Pune Crime News : पुणे जिल्ह्यात कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या घालून हत्या

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. ओंकार उर्फ राण्या बाणखेले असे खून झालेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या तालुक्यात हा प्रकार घडल्याने सूचित संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मृत ओंकार उर्फ राण्या बाणखेले सराईत गुन्हेगार होता. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून त्याचा खून करण्यात आला असावा असा अंदाज वर्तवला जातोय. आज दुपारच्या सुमारास काही हल्लेखोरांनी त्याच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. बंदुकीची गोळी डोक्यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन रूग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंचर पोलीस ठाण्यात या प्रकरणी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.