Pune Crime News : वारजेतील कुख्यात गुंड गंग्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

एमपीसी न्यूज – नागरिकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारा वारजे माळवाडी परिसरातील त्यात गुंड गंग्या उर्फ विकी विष्णू आखाडे (वय 24) याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई करण्यात आली असून त्याला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

गंग्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, शस्त्र बाळगणे, दरोडा यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गंग्याच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या पार्श्वभूमीमुळे वारजे माळवाडी परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. त्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी नागरिक घाबरत होते.

दरम्यान वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी गंग्याविरोधात एमपीडीए कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर गंग्याला येरवडा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.