Pune Crime News : कुख्यात गुंड बाळा दराडे जेरबंद, तीन वर्षापासून होता फरार

एमपीसी न्यूज – पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात दहशत माजवणारा आणि पिस्तुलांची तस्करी करून तरुणांना गुन्हेगारी क्षेत्राकडे वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुंड बाळा दराडे याला अखेर बारामती तालुका पोलिसांनी जेरबंद केले.

गेल्या तीन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी त्याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. बारामती तालुका पोलिसांच्या विशेष गुन्हे शोध पथकाने नाशिक येथून त्याला अटक केली.

बाळा दराडे म्होरक्या असलेल्या दराडे गॅंगने आपली दहशत माजवली होती. उद्योजकांना धमकावून खंडणी वसूल करणे, चोरी, दरोडा, मारामारी असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल होते. इंदापूर आणि भिगवण पोलीस ठाण्यात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र आतापर्यंत त्याला अटक करण्यात आली नव्हती. मागील तीन वर्षांपासून जो पोलिसांना चकवा देत फिरत होता. अखेर नाशिक येथून त्याला अटक करण्यात आली.

बारामती तालुका पोलिसांना गुंड बाळा दराडे का नाशिक मध्ये राहात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर विशेष गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी नाशिक येथून त्याच्या मुसक्या आवळल्या. दराडे हा तीन वर्षापासून फरार होता त्याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस देखील घोषित केले होते.

ही कामगिरी बारामती तालुका पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे, पोलीस कर्मचारी विजय पांढरे, विजय वाघमोडे, नंदू जाधव, विनोद लोखंडे यांनी केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.