Pune Crime News : फर्ग्युसन रस्त्यावर एटीएममध्ये छेडछाड करुन पाच लाख रुपये काढून नेले

एमपीसी न्यूज – फर्ग्युसन रस्त्यावरील कॅनरा बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये छेडछाड करून एक महिला आणि पुरुषाने तब्बल पाच लाख रुपये काढून घेऊन बँकेची फसवणूक केली आहे. 18 मार्च रोजी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून एक अनोळखी महिला आणि पुरुषाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन रस्त्यावर कॅनरा बँकेचे एटीएम सेंटर आहे. 18 मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक महिला आणि एक पुरुष एटीएम सेंटर मध्ये आले. त्यांनी एटीएम मशीन च्या पाठीमागे जात एटीएम मशीनमध्ये काहीतरी छेडछाड केली. आणि वीस ते पंचवीस वेळा ट्रांजेक्शन करून तब्बल पाच लाख रुपये काढून घेतले.

शिवाजीनगर पोलीस यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गौड अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.