Pune Crime News : तब्बल 52 कोटींचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसीन्यूज : बनावट कंपन्यामार्फत आर्थिक व्यवहार केल्याचे भासवून तब्बल 52 काेटी 19 लाख 15 हजार रुपयांचा जीएसटी बुडवून जीएसटी खात्याची फसवणुक केल्याप्रकरणी व्यवसायिक तुषार अशाेक मुनाेत (रा.बार्शी,साेलापूर ) यास पुणे जीएसटीच्या गुप्तचर पथकाने अटक केली. मुनोतला गुरुवारी पुणे न्यायालयात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमाेर त्याला हजर केले असता, न्यायालयाने त्यास 14 दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली आहे.

मुनोत हा मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्हयातील परांडा तालुक्यातील एका गावात नातेवाइकाच्या घरी लपून बसला हाेता. 263 काेटी 60 लाख रुपयांचे व्यवहारावरील 52 काेटी 19 लाख रुपयांचा जीएसटी कर बुडवून त्याने गैरव्यहार केल्याचे जीएसटी विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

मुळचा साेलापूर जिल्हयातील असलेला तुषार मुनोत हा पुण्यात व्यवसायिक म्हणून कार्यरत हाेता. त्याने कागदाेपत्री 5 बाेगस कंपन्या स्थापन केल्या.

व्यवहारासाठी बनावट कंपन्याचे इनव्हाईस तयार करुन ते स्वत:च्या कंपन्याच्या खात्यावर पैसे देताना जीएसटीचा भरणा केला असे भासवत हाेता. बँकांच्या माध्यमातून संबंधित पैसे काढून पैसे भरणा करणाऱ्यांना त्यांचे कमिशन देऊन उर्वरित रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरत हाेता.

बँकांची दिशाभूल करुन त्याने अनेक बँकेचे कर्ज ही घेतले आहे. अशाप्रकारे त्याने काेणत्याही कंपनी मार्फत वस्तू आणि सेवांचा पुरवठा न करता केवळ कागदाेपत्री काेटयावधी रुपयांचा गैरव्यवहार केला.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश याठिकाणी त्याचे व्यवसायाचे रॅकेट विस्तारलेले हाेते. काेणत्याही प्रकारची वस्तू-सेवाचा पुरवठा न करता त्याने बनावट कंपन्याचे माध्यमातून जीएसटी विभागाची फसवणुक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

जीएसटीच्या गुप्तचर पथकास याची माहिती मिळाल्यानंतर पुरावे गोळा करण्यात आले. त्यानंतर जीएसटी गुप्तचर पुणे विभागाचे जाॅइंट डायरेक्टर सुहेल काझी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मुनोतला गुरुवारी पुणे न्यायालयात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमाेर त्याला हजर केले असता, न्यायालयाने त्यास 14 दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.