Pune Crime News : पुणे महानगरपालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एकाची चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल चार लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात हा प्रकार घडला असून हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अनिता भाऊसाहेब भंडारे (वय 30, रा. पद्मावती रेसिडेन्सी मसोबा वस्ती मांजरी बुद्रुक) यांनी फिर्याद दिली असून आरोपी हर्षल पोस्ट हरिश्चंद्र प्रभाकर बटुळे (वय 30, रा. डावखरे बिल्डिंग, आळंदी रोड विश्रांतवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेच्या भावाला पुणे महानगरपालिकेत अतिक्रमण विभागामध्ये सहाय्यक अधिकारी या पदावर कामास लावतो असे खोटे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी चार लाख रुपये घेतले. परंतु तरीही नोकरी न लागल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.