_MPC_DIR_MPU_III

Pune Crime News : ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन मुलींची सुटका तर चार आरोपी अटकेत

एमपीसीन्यूज : वेबसाईटच्या माध्यमातून चालणाऱ्या ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेने पर्दाफाश केला. पोलिसांनी यातून दोन तरुणींची सुटका केली तर वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

पवित्रकुमार नागेश महतो, दिलीप कुमार उर्फ करण परमेश्वर महतो, सचिन कुमार वासुदेव मंडल आणि अनिल कुमार मेकलाल मंडल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर नेपाळ आणि सिक्कीम येथील दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, सामाजिक सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना ऑनलाईन वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

_MPC_DIR_MPU_II

एका वेबसाईटच्या माध्यमातून एस्कॉर्टद्वारे हा वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी या वेबसाईटवर दिलेल्या क्रमांकावर बनावट ग्राहक बनून संपर्क साधला. त्यानंतर त्यांना वेश्या व्यवसायासाठी एक तरुण मुलगी पाठवण्यात आली.

पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आणखी एक मुलगी अशा प्रकारे वेश्या व्यवसाय करत असल्याचे तिने सांगितले.

पोलिसांनी त्या मुलीची सुटका करत वरील आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.