Pune Crime News : फुकटात सिगारेट न दिल्याने पानटपरी चालकाला मारहाण, पेट्रोल टाकून घरही पेटवले

एमपीसी न्यूज – फुकटात सिगारेट न दिल्याच्या रागातून दोघांनी पानटपरी चालकाला बाहेर काढून त्यांचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही वेळाने त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून राहते घर पेटवून दिले. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हांडेवाडी रोड येथील चिंतामणी नगर येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी आरिफ रफिक सय्यद (वय 33) यांनी तक्रार दिली असून आरोपी नोमन आरिफ सय्यद आणि आत्तू झहुर अन्सारी (दोघेही रा. सय्यदनगर हडपसर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, यांच्या वडिलांचा पान टपरीचा व्यवसाय आहे. रविवारी मध्यरात्री आरोपी हे पानटपरीवर आले आणि त्यांनी सिगारेटची मागणी केली. यावेळी फिर्यादीचे वडिलांनी लॉकडाऊन असल्यामुळे पानटपरी बंद आहे आणि सिगारेटचे पाकीट नसल्याचे सांगितले. यावर आरोपीने “साले बुढे हमको सिगारेट नही देता” असे बोलून फिर्यादीचे वडिलांना खाली पडून त्यांचा गळा दाबला त्यामुळे ते बेशुद्ध पडले होते.

वडिलांना दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर फिर्यादी हे घराबाहेर थांबले असताना आरोपींनी त्या ठिकाणी नेऊन फिर्यादी यांच्या सोबत पुन्हा हुज्जत घातली. “ज्यादा हिरोगिरी मत कर मुझे अब रोज सिगारेट फ्री मे देना पडेगा नही तो काट डालुंगा” असे बोलून कमरेला लावलेला कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. तसेच फिर्यादी जय हॉस्पिटलमध्ये असताना आरोपीने त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून घर पेटवून दिले आहे. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.