Pune Crime News : पाणीपुरी खाल्ली, पैसे मागताच चाकूने वार; शनिवारवाड्यासमोरील घटना

एमपीसी न्यूज-पाणीपुरीच्या स्टॉलवर जाऊन दोघांनी पाणीपुरी खाल्ली. मात्र पाणीपुरी विक्रेत्याने पैसे मागतात त्याच्यावर चाकूने वार करण्यात (PuneCrime News) आले. शिवाजी रस्त्यावरील शनिवार वाड्यासमोर शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेत पाणीपुरी विक्रेता राजेंद्र सिंग दयाराम जाठम (वय 22) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. फरासखाना पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे शनिवारवाड्यासमोर पाणीपुरी विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवतात. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते पाणीपुरीच्या स्टॉलवर असताना दोन अनोळखी व्यक्ती रिक्षातून त्यांच्याजवळ आले. एकाने त्यांना शिवीगाळ करत पाणीपुरी खाण्यास मागितले.
फिर्यादी यांनी पाणीपुरी दिल्यानंतर शेवटी पैसे मागितले असता आरोपींना त्याचा राग आला. त्यांनी खिशातील चाकू काढू फिर्यादी यांच्या हाताच्या कोपरावर व दंडावर वार करून त्यांना गंभीर (PuneCrime News) जखमी केले. तर दुसऱ्या आरोपीने त्यांना हाताने मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.