Pune Crime News : औषधोपचार करूनही आराम पडत नसल्यामुळे रुग्णाने डॉक्टरला बदडले

एमपीसी न्यूज – औषधोपचार करुनही आराम पडत नसल्यामुळे रुग्णाने डॉक्टरकडे उपचारासाठी दिलेले पैसे परत मागितले. परंतु डॉक्टरांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे क्लिनिकची तोडफोड करीत डॉक्टरला काठीने मारहाण करण्यात आली.

ही घटना नवा बाजार खडकी येथे घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी सचिन नावाचा रुग्ण व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी डॉ.रितेश किर्तीकुमार शहा (45,रा.खडकी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी रुग्णावर लघविच्या जागेवर उपचार केले होते. मात्र औषधोपचार केल्यानंतरही आजार बरा झाला नसल्याचे रुग्णाचे म्हणणे होते. यासाठी खर्च झालेले पैसे रुग्ण परत मागत होता. यासाठी त्याने क्‍लिनिकमध्ये साथीदारांसह घुसून शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. क्‍लिनिकची तोडफोड करुन कारची काचही फोडली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.