Pune Crime News : पुणे स्टेशन परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज -पुणे स्टेशन परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेने (Pune Crime News) पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.विलास गावडे असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक मधुकर चव्हाण यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Alandi News : आळंदी मध्ये शिवजयंती निमित्त नितीन बानुगडे पाटील यांचे शिवव्याख्यान

 

गावडे अलंकार चित्रपटगृह परिसरातून निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने गावडे यांना धडक दिली. गावडे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात (Pune Crime News) येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.