Pune Crime News : कुत्र्याच्या पिल्लांचा त्रास होतो म्हणून पाजले विषारी औषध

एमपीसी न्यूज- कुत्र्याच्या पिल्लांचा त्रास होतो म्हणून तरुणाने (Pune Crime News ) पिल्लांना विषारी औषध देऊन मारल्याची घटना सिद्धार्थनगरधील रामनगर येथे घडली .या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राणीप्रेमी अनिकेत संजय राजपूत यांनी तक्रार दाखल केली असून नागेश सोनवणे (रा. रामनगर वारजे, पुणे) असे या तरुणाचे नाव आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील सिद्धार्थनगमधील रामनगर परिसरात मोकळ्या पडीक जागेत घर आहे. तिथे तीन कुत्र्यांची पिल्ले होती. आरोपीने त्या पिल्लांचा त्रास होतो म्हणून त्या पिल्लांना मांसामधून विष दिले  .यात त्या पिल्लांचा मृत्यु झाला. घटनेबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.