Pune Crime News : पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई, 31 गुन्हे दाखल, 48 लाखाचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त

एमपीसीन्यूज : शहरातील विविध भागात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांसह गुन्हे शाखेने छापे टाकले. या कारवाईत 47 लाख 96 हजार रुपयांच्या गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ जप्त करुन 31 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार विशेष पथकासह पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने संयुक्तरित्या ही कारवाई केली. यामध्ये अन्न व औषध प्रशासनाची कोणतीही मदत घेण्यात आली नाही.

_MPC_DIR_MPU_II

गुटखा व्यापा-यांवर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून कोणताही पुढाकार घेतला जात नसल्याने पोलिसांच्या कारवाईवरून दिसून आले आहे.

गुरुवारी एकाच दिवशी छापे टाकण्यात आल्यामुळे अवैध धंदे करणा-यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी हडपसर, मुंढवा, चंदननगर, येरवडा, सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून 22 लाख 27 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. त्यानुसार विविध पोलिस ठाण्यांमध्ये एकूण 12 गुन्हे दाखल करण्यात आले.

तर गुन्हे शाखेने स्वारगेट, भारती विद्यापीठ, चंदननगर, चतुश्रृंगी, कोथरुड, समर्थ, हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून 25 लाख 68 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. संयुक्तरित्या कारवाईत एकूण 31 गुन्हे दाखल करुन 42 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 47 लाख 96 हजाराचा गुटखा जप्त केला गेला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.