Pune Crime News : आरटीआय कार्यकर्ता रवींद्र ब-हाटे विरोधात पोलिसांचे स्टँडिंग वॉरंट जारी

एमपीसीन्यूज : रास्ता पेठेतील एक जागा खंडणी स्वरूपात मागितल्याच्या कारणावरून माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटे याच्यासह चार जणांवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो फरार असल्याने पोलिसांनी ब-हाटे याच्या विरोधात सीआरपीसी 82 प्रमाणे जाहीरनामा स्टॅंडिंग वॉरंट जारी केले आहे.

बांधकाम व्यावसायिक सुधीर वसंत कर्नाटकी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कोथरुड पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आठ आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

यातील आरोपी रवींद्र लक्ष्मण ब-हाटे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेतला परंतु तो अद्यापही सापडला नाही. त्यामुळे न्यायालयाने रवींद्र ब-हाटे याच्या विरोधात सीआरपीसी 82 प्रमाणे जाहीरनामा स्टॅंडिंग वॉरंट जारी केले आहे.

त्यामुळे रवींद्र ब-हाटे याच्याविषयी कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोथरूड पोलीस ठाणे येथील 020-25391010/25391515 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.