Pune Crime News : पुण्यात 1 लाखाची लाच स्वीकारताना पोलीस अधिकारी रंगेहाथ जाळ्यात

एमपीसी न्यूज – फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील एक लाख रुपये स्वीकारताना पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केली.

सहायक पोलीस निरीक्षक राहूल अशोक पाटील (वय, 33) असे पोलीस अधिकार्‍याचे नाव आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात ते कार्यरत आहेत. याशिवाय खासगी इसम संतोष खांदवे (वय 45) याला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी एका 22 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलांवर विमानतळ पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये जामीन मिळण्यास मदत होईल यासाठी तपासात आवश्यक ती मदत करण्यासाठी राहुल पाटील यांनी पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 3 लाख रुपये ठरले होते. यातील 1 लाख रुपये स्वीकारताना खासगी इसम संतोष खांदवे (वय 45) याला रंगेहाथ पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.