Pune Crime News : पोलीस अंमलदाराला धक्काबुक्की, चौघांना अटक

एमपीसी न्यूज – सिग्नल तोडून पळून जाणाऱ्याला थांबविल्याच्या रागातून त्याने साथीदारांच्या मदतीने पोलीस अंमलदाराला धक्काबुक्की करीत ढकलून दिले. त्यामुळे अंमलदार जखमी झाले आहेत. याप्रकरणी चौघाजणांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केले. ही घटना काल संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास कोरेगाव पार्क जंक्शन चौकात घडली.

शशिकांत जयस्वाल वय 30, देवेंद्र राम प्यारे जयस्वाल, दीपक रामप्यारे जयस्वाल वय 25, गोविंदा रामप्यारे जयस्वाल वय 23 अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार नवनाथ पवार यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस अंमलदार नवनाथ पवार काल कोरेगाव पार्क जंक्शन चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी शशिकांत जयस्वाल सिग्नल तोडून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी पवार यांनी त्याला थांबण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे शशिकांतने त्याचा साथीदार देवेंद्रला बोलावून घेतले. पोलिसांना काय अधिकार आहे थांबवायचा, तुझी नोकरी घालवतो असे म्हणत ते पवार यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना खाली ढकलून देत जखमी केले. त्यानंतर इतर साथीदारांना बोलावून आरोपींनी पवार यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.