Pune Crime News : नोकरी घालवीन म्हणत पोलीस अंमलदाराला धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – पोलीस अंमलदार परस्परविरोधी भांडणाच्या तक्रारी लिहून घेत असताना तरुणाने मला साईडला बसायला का सांगता, मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे काय, तुमची मी नोकरी घालवीन असे म्हणत शिवीगाळ करणाऱ्याला कोथरुड पोलिसांनी अटक केले. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री साडेदहाच्या सुमारास एरंडवणा पोलीस चौकीत घडली.

राहूल भरम (रा. केळेवाडी, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार कौस्तुभ निढाळकर (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे.

दोन दिवसांपुर्वी आरोपी राहूल भरम आणि राहूल वाघ यांच्यात भांडण झाले होते. त्यामुळे दोघेही एरंडवणा पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलीस अंमलदार कौस्तुभ हे राहूल वाघ यांची तक्रार लिहून घेत होते. त्यावेळी राहूल भरमने त्यांना नोकरी घालविण्याची धमकी देउन शिवीगाळ केली. त्याशिवाय धक्काबुक्की करीत दुखापत केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वाय. बी. पडवळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.