Pune Crime News : नवले पुलाजवळ हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज- नवले पुलाजवळ एका हाॅटेलमध्ये बेकायदा सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (Pune Crime News) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मयूर प्रकाश माने (वय 27, रा. साई द्वारिका सोसायटी, वडगाव), प्रणीत संजय पोटपिटे (वय23, रा. दांगट पाटील नगर, शिवणे), आदर्श अशोक गज्जर (वय 30, रा. एनडीए रस्ता, उत्तमनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Delhi News : देशभरातील 350 हून अधिक जिल्ह्यांमध्ये रोजगार निर्मिती केंद्र सुरू-प्रकाश चंद्र

नवले पुलाजवळ डेक्कन पॅव्हेलियन हाॅटेलच्या इमारतीतील छतावर ॲरो हाॅटेल आहे. या हाॅटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू, अन्य साहित्य, असा 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हुक्का पार्लरमधील तीन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, सुजीत वाडेकर, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी (Pune Crime News) आदींनी ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.