Pune Crime News : बसवर कारवाई केल्यामुळे पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की

मुंढव्यातील केशवनगर चौकातील घटना

एमपीसीन्यूज ; वाहतूक नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी लक्झरी बसवर कारवाई केल्याच्या रागातून बस चालकाने पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की केल्याची घटना मुंढव्यातील केशवनगरमध्ये घडली.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश दौंडकर यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक दौंडकर काल सकाळी दहा वाजता मुंढव्यातील केशवनगर चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका लक्झरी चालकाला दौंडकर यांनी अडविले.

त्याच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई केली. त्याचा राग आल्यामुळे बसचालकाने पोलीस उपनिरीक्षक दौंडकर यांना धक्काबुक्की करून बघून घेण्याची धमकी दिली.

पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.