Pune Crime News : ‘सॉरी मॉम’ लिहून पोलीस शिपायाची आत्महत्या

एमपीसीन्यूज : ‘सॉरी मॉम’ लिहून ठेवत पुणे ग्रामीण पोलीस दलात काम करणाऱ्या पोलीस शिपायाने आत्महत्या केली.

रज्जाक महंमद मणेरी, असे आत्महत्या केलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्यात तो काम करत होता. त्याने सुरवातीला नस कापून आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

रजाक हा पुणे जिल्ह्यातील किकवी गावात राहत होता. रविवार दुपारपासून त्याचे नातेवाईक त्याला फोन करत होते. परंतु, तो फोनला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे नातेवाईकांनी आज, मंगळवारी सकाळी येऊन पाहणी केली असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. रज्जाक मणेरी हा मुळचा इंदापूर तालुक्यातील रहिवाशी आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांना मृतदेहा शेजारी एक चिठ्ठी सापडली. यामध्ये त्याने सॉरी मॉम असे लिहिले होते. त्याने आत्महत्या का केली, याचा तपास पोलीस करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.