Pune Crime News : पूजा चव्हाण प्रकरणी पुणे शहर भाजपच्या उपाध्यक्षा स्वरदा बापट यांचा पोलिसात तक्रारअर्ज

एमपीसी न्यूज – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या सूनबाई आणि पुणे शहर भाजपच्या उपाध्यक्षा स्वरदा बापट यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

संजय राठोड याच्यावर कलम 306, 107 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्वरदा बापट यांनी वानवडी पोलिसांकडे केली. या प्रकरणात ज्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या त्यातून संजय राठोड यांचे संबंध पूजा चव्हाणशी होते, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून किंवा प्रेमभंगातून किंवा संजय राठोड यांच्याकडून होणाऱ्या दबावाला कंटाळून पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली असे स्वरदा बापट यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्वरदा बापट यांनी केली.

_MPC_DIR_MPU_II

इतके दिवस या प्रकरणात कोणी तक्रार दिली नाही म्हणून तपासाला मर्यादा येत असल्याचे पोलीस सांगत होते, परंतु आता तक्रार अर्ज झाल्याने पोलीस नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.