Pune Crime News : सेनापती बापट रस्त्यावर भरधाव कारच्या धडकेत मंडल अधिकारी महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर भरधाव वेगातील एका बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्याने पायी जात असलेल्या मंडल अधिकारी महिलेचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हिलियन मॉल समोर ही घटना घडली. 

रिना सिताराम मुंडे ऊर्फ रिना सचिन मडके (वय 32) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या सेनापती बापट रस्त्यावरील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण येथे मंडल अधिकारी म्हणून काम करत होत्या.

याप्रकरणी कार चालक अक्षय महादेव एकडे (वय 25, शैलेश अपार्टमेंट ई-स्क्वेअर समोर, मॉडेल कॉलनी) याला चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. सचिन नारायण मडके यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी आपले काम संपल्यानंतर रिना घरी जाण्यासाठी पाय निघाल्या होत्या. मॉल समोरील बस स्टॉपवर जाण्यासाठी त्या रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील कारने त्यांना जोराची धडक दिली.

या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. चतुःश्रृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.