Pune Crime News : खडकीत कोयत्याने वार करत चिकन विक्रेत्याचा खून, चौघे ताब्यात

एमपीसी न्यूज – पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका चिकन विक्रेत्याचा कोयत्याने वार व फरशी डोक्यात घालून निर्घृण खून करण्यात आला. माहिती मिळाल्यानंतर खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चार जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

रजनीकांत ऊर्फ मॉन्टी सुंगदर परदेशी (वय 32, रा. बोपोडी, खडकी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीसांनी मन्सुर मौला शेख (वय 19) यांच्यासह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, मयत रजनीकांत ऊर्फ मॉन्टी याचे बोपोडीत चिकन विक्रीचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका व्यक्तीकडून उसने पैसे घेतले होते. परंतु, रजनीकांत पैसे परत करत नसल्यामुळे आरोपीने त्याची दुचाकी उचलून नेली होती. मृत रजनीकांत यांनी त्याच्या एका मित्राला सांगून दुचाकी परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. याचाच राग आरोपीच्या मनात होता.

आरोपींनी आज दुपारच्या सुमारास रजनीकांतला फोन करून तुला दुचाकी देऊन टाकतो आणि आपला वाद मिटवू, असे सांगून बोपोडीतील मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी त्याला बोलावले आणि आल्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तर डोक्यात फरशी घालून खून केला. खडकी पोलिसांनी धाव घेतली. शोध घेऊन आरोपींना पकडले आहे. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.