Pune Crime News : गुन्हेगारी टोळ्यांना मदत करत असल्याच्या संशयावरून शहरातील बड्या राजकीय नेत्याची पुणे पोलिसांकडून चौकशी

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसात पंधराहून अधिक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला आहे.

या गुन्हेगारी टोळ्यांना मदत करणारेही पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्या विरोधातही कडक कारवाई करण्यात येत आहे. पुणे शहरातील बड्या राजकीय नेत्यांची ही मंगळवारी पोलीस आयुक्तालयात चौकशी करण्यात आली. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांना मदत करणाऱ्यांची देखील धाबे दणाणले आहेत.

कुख्यात गुंड गजानन मारणे याने तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर जंगी मिरवणूक काढली होती. या घटनेनंतर पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर पोलिसांनी पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली.

मागील पाच महिन्यात पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दीडशेहून अधिक गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई केली. तर पंधराहून अधिक गुन्हेगारांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले. गुन्हेगारी टोळ्यांना मदत करणारे आता पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येत आहे.

त्यातूनच पुण्यातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला मंगळवारी सायंकाळी पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. कुख्यात गुंड गजा मारणे याला आणि गुन्हेगारी टोळ्यांना मदत करत असल्याच्या संशयावरून या पदाधिकाऱ्यांची तब्बल तासभर चौकशी करण्यात आली. या घटनेने मात्र शहरातील गुन्हेगारी टोळ्यांना मदत करणाऱ्यांचे धाबे चांगले दणाणले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.