Pune Crime news : दत्तवाडीतील जुगार अड्डयावर छापा, जुगार अड्डा मालकासह 15 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दत्तवाडी भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (Pune Crime news) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्ड्याच्या मालकासह 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दत्तवाडी भागात एका पत्र्याच्या खोलीत जुगार, तसेच मटका अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
या कारवाईत जुगार खेळण्याचे साहित्य, मोबाइल संच असा 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार अड्डयाचा मालकासह जुगार खेळणाऱ्या 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, अजय राणे, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण आदींनी ही कारवाई (Pune Crime news) केली.