Pune Crime News: डेक्कन परिसरातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा; 12 जण ताब्यात

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने डेक्कन परिसरातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगार खेळणाऱ्या तब्बल बारा जणांना ताब्यात घेतले. डेक्कन येथील उच्चभ्रू परिसरात असणाऱ्या या या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा टाकल्याने परिसरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले.

गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेक्कन जिमखान्यालगत असणाऱ्या पोरवाल नामक इमारतीत जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आता काही नागरिक त्यांना अंदर-बाहर नामक जुगार खेळताना दिसून आले.

पोलिसांनी या ठिकाणाहून जुगार खेळणाऱ्या दहा जणांना आणि जुगार चालवणाऱ्या  दोघांना अशा बारा जणांना ताब्यात घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.