Pune Crime News : बिबवेवाडीत गावठी दारुच्या अड्ड्यावर छापा; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – येथील बिबवेवाडी परिसरात पोलिसांनी गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून तीन जणांना अटक केली.त्याशिवाय 40 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

बिबवेवाडी येथील अप्पर कोंढवा रोड येथील झांबरे वस्तीवरील अण्णाभाऊ साठे नगर येथे विक्रीसाठी गावठी दारूचा साठा करुन ठेवल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.

 

पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोलीसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आणि घटनास्थळावरून 39 हजार 850 रुपये किमतीची 98.5 लिटर गावठी दारु आणि रोख रक्कम 830 रुपये असा एकुण 40 हजार 860 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 

याप्रकरणी शारदा किसन सोनावणे (वय 60, रा. आण्णा भाऊ साठे नगर बिबवेवाडी कोंढवा रोड),अनिल यशवंत गुप्ते (वय 28, रा. आण्णा भाऊ साठे नगर बिबवेवाडी कोंढवा रोड), विजय सिताराम कट्टीमनी (वय 24,रा. आण्णा भाऊ साठे नगर बिबवेवाडी कोंढवा रोड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 

या आरोपींकडून 39 हजार 850 रुपयांची 98.5 लिटर गावठी दारू व रोख रक्कम 830 रुपये असा 40 हजार 680 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.