Pune Crime News : गजा मारणे टोळीतील राकेश पठारेला अटक ; रॅलीतील जॅग्वार गाडी जप्त

एमपीसी न्यूज – गजा मारणे टोळीतील आरोपी राकेश पठारेला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या जवळून रॅलीतील जॅग्वार गाडी जप्त करण्यात आली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजा कारागृहातून सुटल्यावर गुन्हेगार गजा मारणे याने काढलेल्या रॅलीत असणाऱ्या गाडयांचे व गाडी मालकांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार आरोपी राकेश पठारे (वय 33, रा. यशवंतनगर, खराडी, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याजवळून रॅलीत वापरलेली किमत 50 लाख रुपयांची जॅग्वार कार जप्त करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.