Pune Crime News : ससून रुग्णालयातून रुग्णासाठी आणलेले रेमडेसिविर इंजेक्शन चोरले

एमपीसी न्यूज – रेमिडेसिव्हीर इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना फरफट करावी लागत असताना ससून रुग्णालयात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला. रुग्णासाठी आणलेले रेमडेसिविर इंजेक्शनचा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आधीच तुटवडा असताना आता थेट चोरी झाल्यामुळे रुग्णालय प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे.

याप्रकरणी लता रावडे (वय 57) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी या ससून रुग्णालयात परिसेविका आहेत. त्या ज्या कोरोना वार्डात नेमणुकीसाठी होत्या तेथील कोरोनाबधित रुग्णासाठी रेमिडेसिव्हीर इंजेक्शन मागविले होते. त्या रुग्णाच्या नावावर संध्याकाळी दोन इंजेक्शन आले होते. त्यातील एक इंजेक्शन रुग्णाला देण्यात आले. तर दुसरे इंजेक्शन (व्हायल) खाली आणून ठेवले.

परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा फिर्यादी या इंजेक्शन आणण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना इंजेक्शन सापडले नाही. हा सर्व प्रकार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवला. त्यानंतर हे इंजेक्शन चोरीला गेल्याचे समोर आले. फिर्यादीने त्यानंतर तत्काळ पोलीस ठाण्यात इंजेक्शन चोरी झाल्यासंदर्भात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.