Pune Crime News : उच्चशिक्षित आयटी इंजिनिअरला नोकरीच्या बहाण्याने 21 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज : जादा पगाराच्या आमिषाला बळी पडलेल्या एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअरला सायबर चोरट्यांनी नोकरीच्या बहाण्याने 21 लाखांचा गंडा घातला. सायबर चोरट्याने संबंधित तरुणाला उच्च पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 20 लाख 65 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना जून 2019 ते ऑक्टोबर 2020 कालावधीत कोथरुडमध्ये घडली.

याप्रकरणी माधव केंजळे (वय 40, रा. कोथरुड ) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका आयटी कंपनीत कामाला आहेत. जून 2019 मध्ये सायबर चोरट्याने त्यांना फोन केला. त्यांच्याशी ओळख वाढवून विश्वास संपादित केला.

त्यानंतर सायबर चोरट्याने माधव यांना उच्च पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी विविध चार्जेसच्या नावाखाली सायबर चोरट्याने त्यांना ऑनलाईन रक्कम भरण्यास सांगितले.

त्यानुसार जादा पगाराची नोकरी मिळण्याच्या अपेक्षेने माधव यांनी मागील वर्षभरापासून तब्बल 20 लाख 65 हजार रुपये सायबर चोरट्याने दिलेल्या बँकखात्यात जमा केले. रक्कम जमा करुनही नोकरी न लावल्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर माधव यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III