Pune Crime News : पाच लाखाच्या बदल्यात 25 लाख वसूल; तरीही 85 लाखाची मागणी, पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घेतलेल्या साडेपाच लाखाच्या बदल्यात तब्बल 25 लाख रुपये देऊनही आणखी 85 लाखांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 53 वर्षीय व्यक्तीने कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सागर कल्याण रजपूत, जिग्नेशा सागर रजपूत, प्रभावती कल्याण रजपूत (रा. पौड रोड, कोथरुड), राणी मारणे (रा. कोथरुड), अमित काळे, भुड्या आणि इतर 5 ते 6 जणांवर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने जिग्नेश रजपूत याच्याकडून साडे पाच लाख रुपये हात उसने घेतले होते. या पैशाच्या व्याजापोटी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी रोख, फोन पे व बँक खात्याद्वारे तब्बल 25 लाख रुपये घेतले. इतक्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीला

व्याजाचे एकूण 85 लाख रुपये झाल्याचे सांगत धमकावले. तसेच जीवे ठार मागण्याची धमकी दिली. फिर्यादीची सिंहगड कॉलेजजवळ असलेली आंबेगाव येथील मिळकतीचे रजिस्टर्ड कुलमुख्यत्यारपत्र, नोटराईज्ड करारनामा व प्रतिज्ञापत्र करुन घेतले. तसेच त्यांचा मित्र अमित उणेसा याच्याकडून देखील 7 लाख रुपये रक्कमेच्या बदल्यात त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन त्याच्या घरी हत्यारासह स्वत:च्या टोळीतील गुंड पाठवत पैसे उकळले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. अधिक तपास कोथरुड पोलीस करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.