-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune Crime News : धारदार शस्त्रांसह सराईत गुन्हेगार जेरबंद ; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : गुन्हे शाखा युनिट एकच्या गस्ती पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून 5 लोखंडी कोयते जप्त केले. पुढील कारवाईसाठी त्याला चतुर्शृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

प्रशांत विश्वास डोंगरे (वय 19 वर्ष रा. 337/954 विटकर बंगलो, पांडवनगर पुणे), असे अटक आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखा युनिट एकचे अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमलदार सचिन जाधव व दत्ता सोनवणे यांना रेकॉर्डवरिल गुन्हेगार प्रशांत डोंगरे हा हत्यारे घेऊन विटकर बंगला, पांडवनगर येथे उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

त्यानुसार युनिट एकच्या पथकाने घटनास्थळी जावून खात्री करीत आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याजवळील पिशवीची झडती घेतली असता त्यात एकूण 5 लोखंडी कोयते आढळून आले. त्यामुळे त्याच्याविरोधात चतुर्शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पुढील कारवाईसाठी त्याला चतुर्शृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अमलदार सचिन जाधव, दत्ता सोनवणे, अशोक माने, आयाज दाद्दिकर, शशीकांत दरेकर व महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn