Pune Crime News : ससून रुग्णालयात चोरी करणारा चोरटा जेरबंद; ‘या’ साहित्याची केली चोरी

एमपीसीन्यूज : बंडगार्डन पोलिसांनी एका भंगार चोराला अटक केली आहे. त्याने ससून रुग्णालयाच्या आवारातील लोखंडी पाइप, जाळी आणि इतर लोखंडाचे साहित्य चोरले होते.

उमेश किसन राठोड (वय 30) चोरट्याचे नाव आहे. फरहात इनामदार यांनी याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयाच्या आवारात काही किरकोळ कामे सुरू आहेत. या कामाच्या संदर्भातील आणि इतर साहित्य त्या ठिकाणी लोखंडी पाईप, जाळ्या, भंगार आदी साहित्य होते. हे सर्व साहित्य उमेश राठोड चोरून नेऊ लागला होता.

फिर्यादी फरहात इनामदार यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.